मुंबई पाहण्यासाठी एका वर्षामध्ये तब्बल ७०० मुलांनी घर सोडल्याचे समोर आले आहे.रेल्वे सुरक्षा दलाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली असून सेंट्रल रेल्वेच्या स्टेशनवर सर्वाधिक १२९ मुले सापडली आहेत.मुंबई आणि उपनगरीय रेल्वे स्थानक परिसरातून तब्बल ७०६ मुलांना पकडण्यात आले आहे. त्यात ३६० मुले आणि १६८ मुलींचा समावेश आहे. मध्य उपनगरीय परिसरात सुमारे १७८ मुलांना ताब्यात घेण्यात आले. ज्यात ११५ मुले तर ६३ मुलींचा समावेश आहे. पकडण्यात आलेल्या मुलांमध्ये जवळपास १३ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश होता.ही मुले उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून पळून आली होती.मुंबईमध्ये पळून आलेल्या मुलांपैकी अधिकांश मुले ही बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी यासाठी पळाली आहेत. काही उद्योग, नोकरीच्या प्रेमापोटी तर काही निव्वळ मुंबई पाहण्याच्या हेतूने पळाली आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews